
छत्रपती संभाजीनगर : न्यू नंदनवन कॉलनी परिसरातील महिला सावकार चारुशीला इंगळे हिच्याविरोधात छावणी पोलिस ठाण्यात अवैध सावकारीसंदर्भात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तिने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्जही न्यायालयाने पाच दिवसांपूर्वी फेटाळला, मात्र त्यानंतर छावणीसह शहर पोलिस दलाचा व्हीआयपी बंदोबस्त लागला अन् सावकार महिला संधी साधत फरारी झाल्याचे समोर आले.