Highway robbery
esakal
छत्रपती संभाजीनगर
Kalamb Crime News : पोलीस कारवाईत दोन आरोपी अटकेत; सोलापूर-धुळे हायवेवरील लूट प्रकरणाचा पर्दाफाश
Highway robbery : सोलापूर–धुळे महामार्गावर कंटेनर लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करून दोन आरोपींना अटक केली असून ८.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
दिलीप गंभिरे
कळंब : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांमधून लूट करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने पर्दाफाश करत दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ८ लाख २८ हजार ६५९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, २४ डिसेंबर २०२५ रोजी ट्रक चालक रामजी शोभनाथ यादव हे कंटेनरमधून नवीन टायर घेऊन सोलापूर-धुळे हायवेवरून जात असताना, लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा परिसरात त्यांच्या कंटेनरमधील नवीन टायर अज्ञात आरोपींनी लुटले होते.या गंभीर गुन्ह्याचा तपास उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी पथकाला विशेष सूचना दिल्या.

