

Sillod local body election updates
esakal
निल्लोड : केऱ्हाळा जिल्हा परिषद गटात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच इच्छुकांनी गावोगावी मतदारांच्या घरी जाऊन भेटीगाठी सुरू केल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. मतदारांशी थेट संवाद साधत आपली उपस्थिती ठसवण्याचा प्रयत्न अनेक इच्छुकांकडून केला जात आहे.