Jayant Patil : पदाधिकारीच उमेदवारीचा निर्णय घेतील; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,विधानसभा निवडणुकीत काहींवर अन्याय झाला
Maharashtra politics : विधानसभा निवडणुकीत अन्याय झाल्याची कबुली जयंत पाटील यांनी दिली असून आता मनपा व स्थानिक निवडणुकांत उमेदवारीचा निर्णय स्थानिक पदाधिकारीच घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
छत्रपती संभाजीनगर : विधानसभेच्या निवडणुकीत आमच्याकडून काहींवर अन्याय झाला. ऐनवेळी अर्ज मागे घेण्याची वेळ आली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती. बाहेरून आलेल्यांना संधी मिळाल्याने पक्षातील लोक नाराज झाले.