लाॅकडाऊनमुळे व्यवसाय बंद, तरुण व्यावसायिकाने केली आत्महत्या

तरुणाची आत्महत्या
तरुणाची आत्महत्या
Updated on

औरंगाबाद : आर्थिक विवंचनेतून (Financial Problem) ३४ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना पडेगाव येथील सैनिक कॉलनी येथे सोमवारी (ता.९) पहाटे उघडकीस आली. भाऊलाल हिरालाल वाणी (३४ रा. माजी सैनिक कॉलनी, पडेगाव) असे आत्महत्या करणाऱ्या (Crime In Aurangabad) तरुणाचे नाव आहे. भाऊलाल हा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय करत असे. मात्र दोन वर्षापासून लॉकडाऊन (Lock Down Impact) असल्याने त्यांचा व्यवसाय बंद झाला होता. दरम्यान बँकेचे हप्ते थकल्याने बँक कर्मचाऱ्यांनी घरी पैशांसाठी तगादा लावला होता. भाऊलाल आर्थिक अडचणीत सापडल्याने नैराश्यात होता. काही दिवसांपासून तो टोल नाक्यावर काम करू लागला होता.

तरुणाची आत्महत्या
समोरील दृश्याने कुटुंबियांनी फोडला हंबरडा, आवाजाने शेजारी धावले

रविवारी (ता.आठ) रोजी रात्री कुटूंबातील सर्वजण झोपेत असताना भाऊलाल याने घरात मंडपच्या दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. पहाटे बहिणीला ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ छावणी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी भाऊलाल याला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल आर. के. खाजेकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Manoj Jarange health update
Devendra Fadnavis on Shiv Sena and NCP Party Ownership
Chhatrapati Sambhajinagar Traffic Issue
woman farmer success story
Marathi News Esakal
www.esakal.com