Loksabha Election 2024 : ठाकरे दर्शनाला, खैरे-दानवे दिमतीला ; वाद विसरून पक्षप्रमुखाच्या दौऱ्यात दिसले सोबत

शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (ता. १९) वेरूळ घृष्णेश्वर आणि खुलताबाद येथील भद्रा मारोतीचे दर्शन घेतले. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सोबत होते. विशेष म्हणजे याच आठवड्यात दोघांमधील वाद समोर आला होता.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 sakal

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (ता. १९) वेरूळ घृष्णेश्वर आणि खुलताबाद येथील भद्रा मारोतीचे दर्शन घेतले. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सोबत होते. विशेष म्हणजे याच आठवड्यात दोघांमधील वाद समोर आला होता. पण, ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त मतभेद विसरून ते एकत्र आल्याचे दिसले.

हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याचा दौरा पूर्ण केल्यानंतर ठाकरे आणि खासदार संजय राऊत मंगळवारी मुक्कामासाठी छत्रपती संभाजीनगरात आले होते. सायंकाळी ते बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वर आणि खुलताबाद येथील भद्रा मारोतीच्या दर्शनासाठी गेले होते. दरम्यान, देवदर्शनावेळी त्यांच्यासोबत खैरे आणि दानवे उपस्थित होते.

लोकसभेसाठी खैरे आणि दानवे यांच्यात चुरस आहे. त्यावरून नुकतेच दोघांत वितुष्ट आले होते. ठाकरे यांनी दोघांना सोबत घेत देवदर्शन केले. यानंतर तरी खैरे-दानवे यांच्यातील वितुष्ट संपुष्टात येणार का? याविषयी शिवसैनिकांमध्ये उत्सुकता आहे.

शक्ती विभागली

छत्रपती संभाजीनगर हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आवडते शहर होते. शिवसेनेला पहिल्याच महापालिका निवडणुकीत २७ नगरसेवक निवडून देत येथील जनतेने बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना भरभरून साथ दिली होती. त्यानंतर विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद अशा सगळ्याच निवडणुकीत शिवसेनेला सातत्याने यश मिळत गेले.

गेल्या निवडणुकीत खैरे यांचा कमी मताने पराभव झाला होता. पण, त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या. शिवसेनेत फूट पडली. त्यात आता जिल्ह्यात ठाकरे गटात दानवे आणि खैरे एकमेकांविरुद्ध बोलत असल्याने पुन्हा स्थानिक पातळीवर गट पडणार का, अशी चर्चाही रंगली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com