Sambhaji Nagar : लोकसंख्येच्या चौपट झाडे लावा

लोणी खुर्द ये,थील पाणी परिषदेत तज्ज्ञांचे आवाहन..,गावगावांत रुजावी जलसंवर्धनाची लोकचळवळ
sambhajo nagar
sambhajo nagarsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : पाण्याचा दुष्काळ की नियोजनाचा अभाव असा विचार करताना आपण लांबचे उपाय करतो, पण जवळचे उपाय करत नाही. आपल्याला जितके पाणी लागते त्यापेक्षा कितीतरी जास्त पाणी आपण वाया घालवतो. पाण्याचे नियोजन झाले तरच पाण्याची बचत होईल. सांडपाण्याचा फेरवापर झाला तर गाव स्वच्छ होईल. झाडांशिवाय पाणी थांबणार नाही. प्रतिमाणसी चार झाडे लागतात. त्यामुळे आपल्या गावातील लोकसंख्येच्या चौपट झाडे लावा. फळझाडांवर भर द्या, असे आवाहन आदर्श गाव पाटोदाचे माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केले.

गावागावात जलसंवर्धनाची लोकचळवळ निर्माण करण्यासाठी गुरुवारी वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे ‘पाणी परिषद’ घेण्यात आली. ‘सकाळ माध्यम समूह’ या परिषदेचे माध्यम प्रायोजक होते. माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर अध्यक्षस्थानी होते. कैलास पाटील बहुउद्देशीय संस्था लोणी खुर्द, सरस्वती सेवाभावी संस्था, भाटवडगाव व उत्कर्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्यावतीने पाणी परिषद घेण्यात आली. ‘सकाळ’च्या मराठवाडा आवृत्तीचे संपादक संतोष शाळिग्राम यांनी परिषदेचे उद्‍घाटन केले.

भास्कर पेरे पाटील व विकास अध्ययन केंद्राच्या समन्वयक रेणुका कड प्रमुख मार्गदर्शक होत्या. या वेळी कैलास पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अर्जुन जाधव, उपाध्यक्ष योगेश हिरे आणि सचिव अरूण सोनवणे, सरस्वती सेवाभावी संस्थेचे सचिव रमेश कुटे, उत्कर्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर हनवते, लोणी खुर्द गावचे सरपंच राधाकृष्ण सोनवणे, उपसरपंच गजला सय्यद, माजी सरपंच आर. के. पाटील आणि गोटुनाना जाधव, राजेंद्र निकम, माधव जाधव, बाबासाहेब पाटील, संजय सोनवणे आदी उपस्थित होते.

sambhajo nagar
Sambhaji Nagar News : आता बाजारभावानुसार शाळांना अंडी

जिल्ह्यातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. काही गावांमध्ये सध्या १५ दिवसाआड पिण्याचे पाणी मिळते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई असून शेतीचे नुकसान, स्थलांतर अशा समस्या निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर, पाणी परिषदेची गरज अधिकच वाढली असल्याचे आयोजकांनी सांगितले. परिषदेत मार्गदर्शन करताना पेरे पाटील यांनी ग्रामस्थांना समप्रमाणात झाडे लावा, असे आवाहन केले.

संत तुकाराम महाराजांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे…’ म्हणत झाडांना ‘सोयरे’ अशी उपमा दिली. आपण संतांना नीट ऐकत नाही. राष्ट्रपुरूषांच्या शिकवणीचे अनुसरण करत नाही. पाऊस कमी झाला, की सप्ताह करावा असे सूचवले जाते. पण सप्ताह म्हणजे सात दिवसांची कार्यशाळा, जिथे सातही दिवस संतांनी, व्याख्यात्यांनी लोकांना काय करावे, यावर मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. रोपटी प्रसाद म्हणून दिली तर उत्तम प्रयोग ठरू शकतो.

गावात जास्तीत जास्त फळझाडे लावायला हवीत. पाटोद्यातील झाडांना यावर्षी दीड लाख नारळं आली. मोठ्या प्रमाणात जांभूळं पिकली. ती इथल्याच मुलांनी, महिलांनी खाल्ली.

पिण्याचे पाणी शुद्ध असावे. त्यामुळे जलस्त्रोत स्वच्छ ठेवा, असेही ते म्हणाले.

यावेळी भाऊसाहेब जाधव, राजेंद्र जगदाळे, पी. आर. नाना जाधव, माजी उपसभापती राजेंद्र मगर आणि रिखमशेठ पाटणी, उत्तम निकम चिकटगावकर, दत्तूभाऊ जाधव, कचरू जाधव, रजनी सोनवणे, ममता जाधव, सुवर्णा हिरे, मोहिनी जाधव आदींसह लोणी खुर्दचे सरपंच-उपसरपंच, सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर उपस्थित होत्या. प्रताप भागवत निकम यांनी सूत्रसंचालन केले.

गाव जपूया

आपल्या खास शैलीत ग्रामस्थांशी संवाद साधताना भास्कर पेरे पाटील यांनी जल व्यवस्थापन, वृक्षारोपण, गावची स्वच्छता, मुलींना शिक्षण, बाहेरचे पदार्थ गावात आणून न खाणे आणि वयोवृद्ध माणसांशी सुसंवाद ठेवण्याचे आवाहन केले.

दुष्काळाची दाहकता

वैजापूर तालुक्यातील वीस गावांमध्ये डिसेंबरमध्येच दुष्काळ ओढवला आहे. पाणी परिषद झालेल्या लोणीखुर्दची गावाची लोकसंख्या ५ हजार असून या गावात आत्तापासूनच १५ दिवसांनी मिळते. शिवाय वैजापूर तालुक्यात चिकटगाव, तलवाडा, वाकला, टुनकी, चिंतरखेडा, खरज, निमगाव, दसकुली आदी गावे असून या सर्व गावांची एकत्रित लोकसंख्या जवळपास दीड लाख आहे. या गावांना शेजारच्या मन्याड धरणातून पाणी मिळते.

निवडक गावात भारत निर्माण योजनेअंतर्गत पाईपलाईन आली तर काही गावात योजना पोचली नाही. या भागात कपाशी आणि मक्याचे पीक होते. पण अवकाळी पावसाने कपाशीच्या पिकांवर बोंडअळीचे संकट आले आणि मक्याचे पीक म्हणावे तसे आले नाही. डिसेंबरमध्येच पिण्याच्या पाण्यापासून ते गुरांसाठी आणि शेतीसाठी पाण्याचे कसे करावे, हा प्रश्न ग्रामस्थांपुढे आहे.

उल्लेखनीय कार्यासाठी पुरस्कार

या वेळी गावात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना कैलास पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने पुरस्कार देण्यात आला. यामध्ये पर्यावरण संवर्धनासाठी डॉ. गणेश जाधव आणि शिक्षण क्षेत्र, महिला-मुले आणि तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका शबाना शेख यांचा सत्कार झाला. डॉ. जाधव रूग्णांना झाड लावण्यासाठी प्रोत्साहन देतात. त्यांनी ४ हजार झाडे आणि १० हजार बियाणांची पाकिटे दिली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com