मानवत येथे गाण्याचा आवाज कमी करण्यास सांगितल्याच्या कारणावरून मारहाण;

मानवत येथे गाण्याचा आवाज कमी करण्यास सांगितल्याच्या कारणावरून मारहाण;
Published on: 
गाण्याचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने दोघांना मारहाण ------------- मानवतमध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल मानवत, ता.१७ (बातमीदार): घरासमोर देवीच्या ठिकाणी मोठ्या आवाजात सुरू असलेले गाणे कमी आवाजात वाजवण्यास सांगितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना शहरातील पेठ मोहल्ल्यात शुक्रवारी (ता.१६) रात्री १०.४५ वाजता घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी प्रसाद विष्णू अळसपुरे (रा. पेठ मोहल्ला, मानवत) यांनी घरासमोरील देवीच्या ठिकाणी मोठ्या आवाजात सुरू असलेले गाणे कमी आवाजात वाजवण्यास सांगितले. याचा राग आल्याने प्रदीप अग्रवाल याने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या भावास मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच रोहित ऊर्फ सदा अग्रवाल याने हातातील कोयत्याने फिर्यादीच्या भावाला मारून गंभीर दुखापत केली. याशिवाय विशाल ऊर्फ गजानन अग्रवाल याने चाकूने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या बोटाला, फिर्यादीच्या भावाला दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद आहे. आरोपींनी फिर्यादीचा भाऊ अभिषेक अळसपुरे, वडील विष्णू आळसपुरे, राजू विभुते यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद आहे. प्रसाद आळसपुरे यांच्या तक्रारीवरून प्रदीप आग्रवाल, रोहित उर्फ सदा आग्रवाल, विशाल उर्फ गजानन आग्रवाल या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे करीत आहेत. ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com