Chhatrapati Sambhajinagar : प्रेयसीला फिरायला नेणाऱ्यांवर प्राणघातक हल्ला

वाळूज परिसरात सिनेस्टाइल घटना, प्रियकरासह चौघांविरुद्ध गुन्हा
lover attack over taking his girlfriend for a tour crime waluj mahanagar
lover attack over taking his girlfriend for a tour crime waluj mahanagarSakal
Updated on

वाळूज महानगर : ‘इन्स्टाग्राम’वर रील बनविणाऱ्या एका एकोणावीस वर्षीय मुलीला आणि तिच्या मैत्रिणीला शिर्डीला फिरायला नेले. याचा राग आल्यामुळे तिच्या प्रियकराने तीन मित्रांसह त्यांची कार अडवून प्राणघातक हल्ला केला. यात कटरच्या वारामुळे दोघे गंभीर जखमी झाले. ही सिनेस्टाइल घटना बजाजनगर येथे घडली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः फोटोग्राफर बद्रीनाथ सखाराम रायकर (वय २८), चेतक रामसिंग उसारे (वय १९) आणि मच्छिंद्र जनार्दन मोगल (वय ३२) हे कारने (एमएच २० जीके २०१३) बजाजनगर येथील ओळखीच्या दोन मुली आणि तिचा भाऊ मंगळवारी (ता. १४) सकाळी अकराच्या सुमारास शिर्डीला गेले होते. तेथून परत आल्यानंतर ते मुलींना त्यांच्या घरी सोडायला आले.

त्यावेळी रात्री ८.४० च्या सुमारास दोन दुचाकीवर चौघे जण आले. त्यांनी बद्रीनाथ रायकर यांच्या कारसमोर दुचाकी आडव्या लावल्या आणि काही एक न विचारता कटर, ब्लेड, दगड, हाताचापटाने मारहाण केली. यात रायकर आणि उसारे गंभीर जखमी झाले. मोगल यास किरकोळ मार लागला. शिवाय कारचेही मोठे नुकसान झाले. या प्रकरणी रायकर याच्या तक्रारीवरून सुमित सुभाष रूपेकर, आरफाज शेख आणि इतर दोघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला.

नेमके कारण काय?

  • फोटोग्राफर रायकर, उसारे व मोगल यांनी दोन मुलींना फिरायला नेले. त्यातील एक रूपेकर याची

  • प्रेयसी होती. त्यावरून हा प्रकार घडला.

मुलीने ओळखले प्रियकराला

या घटनेनंतर त्यांच्यासोबत गेलेल्या दोन मुलींपैकी एकीने सांगितले, ‘मारहाण करणाऱ्या मुलांमधील सुमित सुभाष रूपेकर (वय १९) आणि आरफाज शेख (वय १९, दोघे रा. साजापूर) हे माझे मित्र आहेत. यापैकी सुमितसोबत प्रेमसंबंध होते. आता आमच्यात पटत नाही. त्यामुळे मी त्याला बोलत नाही. त्याच्यासोबतचे इतर मुले माझ्या ओळखीचे नाहीत.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.