Gutkha Smuggling : महागड्या कारमधून सात लाखांचा गुटखा जप्त
Illegal gutkha seized Maharashtra : छत्रपती संभाजीनगरमध्ये महागड्या कारमधून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी ₹७.३२ लाखांचा गुटखा आणि ₹४७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
छत्रपती संभाजीनगर : गादीयाविहार परिसरात महागड्या कारमध्ये गुटख्याची वाहतूक करणाऱ्या चौघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून ७ लाख ३२ हजारांच्या गुटख्यासह ४७ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.