
औरंगाबाद : जहाज बांधणीसाठी लागणारे लाकूड देणाऱ्या मोहगणी (Mahagoni Plantation In Aurangabad) या झाडांची जिल्ह्यात लागवड करण्यात आली आहे. दरवर्षी सात ते आठ फूट वाढणारे झाड सागाच्या झाडांपेक्षा पाच ते सात वर्ष आधी तोडण्यासाठी तयार होते. यामुळे शेतकऱ्यांनी (Farmer) शेताच्या बांधावर, विहिरीजवळ किंवा पडीक जमिनीत लागवड केल्यास चांगला नफा मिळवून देऊ शकतात, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. सागाच्या झाडाच्या तुलनेत तोडायला लवकर येणाऱ्या आणि सागापेक्षा चांगला दर मिळणाऱ्या मोहगणी या झाडांची गंगामाई कृषी उद्योगाकडून गंगापूर (Gangapur) आणि पैठण (Paithan) तालुक्यातील शेतीत (Farm) लागवड करण्यात आली आहे. गंगापूर तालुक्यातील भगतवाडी इथल्या प्रक्षेत्रावर पाच वर्षांपूर्वी लागवड करण्यात आलेली मोहगणीची रोपे आता ३५ ते ४० फूट उंच वाढली आहेत. झाडाची उंच वाढ होत असल्यामुळे सावलीत इतर पिकांची वाढ खुंटण्याचा प्रकार मोहगणीत नाही. अजित सीड्सचे (Ajeet Seeds) शास्त्रज्ञ सुरेंद्र देशमुख म्हणाले, दोन झाडातील व दोन ओळीतील १० बाय १० अंतरावर या झाडांची लागवड केली आहे. एका एकरात ४०० ते ४३५ रोपांची लागवड केली आहे.
गंगामाई कृषी उद्योग समुहाने सुमारे शंभर एकरात मोहगणीच्या रोपांची लागवड केली आहे. सागाचे झाड २० वर्षानंतर तोडण्यायोग्य होते. मात्र, हे झाड १२ ते १५ वर्षांत तयार होते. १२ ते १५ वर्षांत झाड ३० घनफुटापर्यंत वाढते. एप्रिलमध्ये खड्डे करून ते चांगले उन्हात तापू द्यावे. निर्जंतुकीकरण होते. शेणखत, काळी माती आणि निंबोळी पेंड मिसळून ते खड्डे बुजवून घ्यावेत. जुनमध्ये एक-दोन चांगले पाऊस झाल्यानंतर त्यात रोप लावावेत. रोपाखाली शेणखत टाकल्यामुळे उन्नीचा त्रास होऊ नये. यासाठी बीएचसी पावडर टाकावे. तीन ते चार वर्ष थोडेफार हिवाळा, उन्हाळ्यात दहा-पंधरा दिवसांच्या अंतराने दोन तीन लिटर पाणी द्यावे. चार वर्षानंतर त्या झाडाची काळजी करण्याचे कारण नाही. शिवाय यात मरचे प्रमाण खूप कमी आहे. यामुळे या झाडाची लागवड शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकेल.
प्रामुख्याने जहाज बांधणीसाठी आणि जिथे वारंवार पाण्याशी संपर्क येतो. त्या भागातील घरे, समुद्राकाठची हॉटेल्ससाठी मोहगणीच्या लाकडांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. याशिवाय फर्निचर, लाकडाच्या ॲन्टिक वस्तूंसाठी या लाकडाचा उपयोग केला जातो. या लाकडांचा वापर दिवसेंदिवस परदेशात वाढत आहे. चीन या लाकडाची निर्यात करते. आपल्या देशातूनही या लाकडाच्या निर्यातीमधून परकीय चलन मिळू शकते. शेतकऱ्यांच्यादृष्टीने सागाच्या तुलनेत मोहगणी फायदेशीर ठरू शकेल.
समीर मुळे, व्यवस्थापकीय संचालक, अजित सीड्स प्रा.लि.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.