
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने वर्षभरापूर्वीच संशोधक विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरीची सक्ती केली. आता महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून अधिछात्रवृत्ती (महाज्योती-फेलोशिप) साठी २०२१, २०२२, २०२३ च्या बॅचमधील दोन हजार ७५४ संशोधक विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य केली आहे.