
छत्रपती संभाजी नगर ते जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील आळंद परिसरात शुक्रवारी (18 जुलै) दुपारी चार वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. एका भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या हृदयद्रावक घटनेने स्थानिकांमध्ये शोककळा पसरली आहे.