
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठीच्या बीई, बीटेक, एमबीएची तिसरी प्रवेश फेरी पूर्ण झाली. तिसऱ्या फेरीअखेर बीई आणि बीटेकचे राज्यभरात ९५ हजार २५३ (५१.८३ टक्के) प्रवेश निश्चित झाले. तर, एमबीएचे ३२ हजार ६३६ प्रवेश निश्चित झाले. चौथ्या फेरीसाठी रिक्त जागा मंगळवारी जाहीर झाल्या असून विद्यार्थ्यांना पर्याय नोंदणीला २८ ते ३० ऑगस्टची मुदत आहे.