

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा नियोजित वेळेच्या १० ते १५ दिवस आधीच घेतल्या आहेत. त्यामुळे निकालही अपेक्षेपेक्षा लवकर जाहीर होणार आहे. बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मे महिन्याच्या १५ तारखेपर्यंत निकाल जाहीर करण्याचे नियोजन सुरू आहे.