
मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेच्या अनुषंगाने राजकीय हालचालींना वेग आला असून राज्याचा नवा मुख्यमंत्री उद्या (ता.४) ठरणार आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत गट नेत्याच्या नावाची घोषणा होईल. यासाठी केंद्रीय निरीक्षक विजय रुपानी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे मुंबईत दाखल झाले आहेत.