National Highway Accident : साखरपुड्यानंतर गेले फिरायला, खंडोबाचं दर्शनही घेतलं, पण लग्नाआधीच टँकर-दुचाकीच्या धडकेत वधू-वर जागीच ठार
Tragic Road Accident on National Highway 65 : राष्ट्रीय महामार्ग ६५ वर टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार नियोजित वधू-वरांचा जागीच मृत्यू झाला. दर्शन करून घरी परतत असताना ही दुर्घटना घडली.
जळकोट : दस्तापूर (ता. लोहारा, जि. धाराशिव) येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर दस्तापूर गावाजवळ टँकरने दुचाकीस धडक दिल्याने अपघातात नियोजित वधू-वरांचा जागीच (Engaged Couple Death) मृत्यू झाला.