मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचे नियोजन

मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचे नियोजन
Published on
ABD26J79869 -- बसवराज पाटील ----- मराठवाड्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचे नियोजन ​उमरगा, ता. २० (बातमीदार) : मराठवाड्याला दुष्काळमुक्त करणे हे राज्य सरकारचे मुख्य उद्दिष्ट असून, ७२ टीएमसी हक्काचे पाणी आणून हा प्रदेश कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचे नियोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच सहकार चळवळ टिकवण्यासाठी साखर कारखान्यांचे सक्षमीकरण आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे मत विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी मंत्री आमदार बसवराज पाटील यांनी केले. ते रविवारी (ता.२०) मुरूम येथे कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत बोलत होते. ​प्रारंभी ज्येष्ठ नेते शिवराज पाटील, अजित पवार यांना आदरांजली वाहण्यात आली. आमदार पाटील म्हणाले, १९९९ मध्ये अवघ्या आठ महिन्यांत कारखाना उभा राहिला. पूर्वी तालुक्यात फक्त १० हजार टन ऊस होता. आज शेतकऱ्यांच्या कष्टामुळे १८ हजार हेक्टरवर उसाचे क्षेत्र असून यंदाच्या २०२६-२७ हंगामात किमान तीन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट रहाणार असून सभासदांनी संपूर्ण ऊस ‘विठ्ठलसाई’लाच द्यावा, असे आवाहन केले. तर आरोग्य शिबिरांद्वारे रुग्णसेवा दिल्याबद्दल त्यांनी युवा नेते शरण पाटील यांचे कौतुक केले. सभेला नगराध्यक्ष बापूराव पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष सादिक काझी,  संचालक केशवराव पवार,  दिलीपराव पाटील, संगमेश्वर घाळे, शरणप्पा पत्रिके, राजीव हेबळे, दत्तू भालेराव, ॲड. संजय बिराजदार, मंगलताई गरड, इरम्माताई स्वामी, रोहिणीताई पाटील, संतराम बिराजदार, शिवलिंग माळी, ॲड. वीरसंगप्पा आळंगे, प्राचार्य दिलीप गरूड, प्रकाश आष्टे, विजयकुमार सोनवणे, प्रा. शौकत पटेल, भरत मारेकर, रफिक तांबोळी, मल्लीनाथ दंडगे, दत्तात्रय पाटील, प्राचार्य श्रीराम पेठकर उपस्थित होते. विषय पत्रिकाचे वाचन प्रभारी कार्यकारी एस.आर. गवसाणे, सूत्रसंचालन राजू पाटील, आभार ज्येष्ठ संचालक विठ्ठलराव बदोले यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com