
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील अनेक अनुदानित, अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शिक्षकांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे शाळांमध्ये गुणवत्तेला तडे जात असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. नवीन शैक्षणिक धोरण व ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या धोरणात्मक दस्तऐवजांची अंमलबजावणी करत असताना शिक्षक भरती अत्यावश्यक बाब ठरत आहे, असे मत शिक्षण संस्था महामंडळाचे आहे.