
छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाने ‘विकसित महाराष्ट्र-२०४७’ या दूरदृष्टीच्या उपक्रमाअंतर्गत सर्वच विभागांकडून त्यांच्या क्षेत्राशी संबंधित व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी सूचना, संकल्पना आणि अभिप्राय मागविले आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांसाठी ही एक सुवर्णसंधी असली तरी; या प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी करताना मराठी शाळांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सद्यःस्थितीत त्यांच्यापुढे असलेले व्यवस्थापकीय, तांत्रिक आणि धोरणात्मक अडथळे ही अंमलबजावणीच्या दृष्टीने गंभीर समस्या ठरू शकते, असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.