
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेसंदर्भात शासनाने कडक भूमिका घेतली आहे. वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर कोणतीही प्रोफाइल दुरुस्ती किंवा बदल मान्य केला जाणार नसल्याचे स्पष्ट निर्देश उपसचिव नीला रानडे यांनी सर्व जिल्हा परिषदांना दिले आहेत.