

CM Devendra Fadnavis
sakal
फुलंब्री (जि. छत्रपती संभाजीनगर) : ग्रामपंचायतींना विकासाचे केंद्रबिंदू बनवून त्यांची क्षमता वाढविण्याचे उद्दिष्ट ‘समृद्ध पंचायतराज’ अभियानातून साधले जात आहे. राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतींना रोल मॉडेल बनविण्याचा संकल्प आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, डिजिटल सुविधा, महिला सक्षमीकरण आणि रोजगारनिर्मिती या बाबींवर सरकारचा विशेष भर आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुलंब्री येथे केले.