औरंगाबाद : देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदापासून डावलले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

औरंगाबाद : देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदापासून डावलले

औरंगाबाद : मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेले देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याचा आदेश दिल्यामुळे भाजपमध्ये ब्राह्मण समाजात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. फडणवीस हे ब्राह्मण जातीचे आहेत म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपदापासून डावलले गेले असल्याचा आरोप परशुराम सेवा संघातर्फे करण्यात आला आहे.

परशुराम सेवा संघाने शनिवारी प्रसिद्धीपत्राकाद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. या पत्रकानुसार, कधीही जातीयवाद न करणारे देवेंद्र फडणवीस हे एक असामान्य व्यक्ति आहेत, हे त्यांच्या कृतीतून वारंवार दिसून येते. जनसामान्यांच्या मनातील मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या काळात केलेले काम उल्लेखनीय आहे.

नगरसेवक ते मुख्यमंत्री असताना केलेल्या कामात एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जातीच्या लोकांना एकत्रित बांधून ठेवायचे काम केले आहे. दरम्यान महाराष्ट्र नाही तर गोवा, बिहार, हैदराबादमध्ये ही आलेल्या सत्तेत फडणवीस यांचे मोठे योगदान आहे. असे असताना फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घ्यायला लावली. केवळ फडणवीस हे ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना डावलण्यात आले असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

पत्रकावर मिलिंद दामोदरे, केदार पाटील, साकेत खोचे, वसंत किनगांवकर, श्रीनिवास कुलकर्णी, विकास कुलकर्णी, विजया कुलकर्णी, जयश्री कुलकर्णी, विजया अवस्थी, विकास गोरवाडकर, सुधाकर तुंगार, रामचंद्र अंधारकर, अंजुषा कुलकर्णी, जयश्री अकोलकर, शिल्पा देशपांडे, महेश कुलकर्णी, अंजली जोशी, स्नेहल खेर्डेकर, स्मिता जोशी, अरविंद पाठक, गीता आचार्य, सोनिया जोशी, कल्याणी मुळे, धनंजय पांडे, विश्वनाथ दाशरथे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Maharashtra Politics New Government Devendra Fadnavis Chief Minister Aurangabad Brahmin Community

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top