तालुक्यात रब्बी पेरणी क्षेत्रात मोठी घसरण

तालुक्यात रब्बी पेरणी क्षेत्रात मोठी घसरण
Published on: 
तालुक्यात रब्बी पेरणी क्षेत्रात मोठी घसरण --- शेतकऱ्यांसमोर भाकरीसह जनावरांच्या चारा-पाण्याचे संकट --- ​जळकोट, ता. १६ (बातमीदार) : तालुक्यात यंदा खरीप हंगामाला बसलेला फटका, घसरलेली पाणीपातळी आणि विहिरींनी गाठलेला तळ यामुळे जळकोट तालुक्यातील शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. याचा थेट परिणाम रब्बी हंगामातील पेरणीवर झाला असून, तालुक्यातील रब्बी पेरणी क्षेत्रात यंदा कमालीची घट झाल्याचे तालुका कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. ​प्राप्त आकडेवारीनुसार, तालुक्याचे सरासरी क्षेत्र ३,९४६ हेक्टर आहे. २०२५-२६ मध्ये ६,७१७ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली होती. मात्र, चालू वर्षी केवळ ६०३.४० हेक्टरवरच रब्बीची पेरणी होऊ शकली आहे, अशी माहिती उपकृषी अधिकारी ज्ञानोबा हंगरगे यांनी दै. ‘सकाळ’शी बोलताना दिली. ज्यांच्याकडे विहीर, बोअर आहे त्यांनीही घसरलेल्या पाणीपातळीचा विचार करून अत्यल्प पाण्यावर रब्बी घेण्याचा प्रयत्न केला आहे. ---- झालेली पेरणी हेक्टरमध्ये हरभरा - १६२ रब्बी ज्वारी - २९७.४० हायब्रिड ज्वारी-९१.८ भुईमूग - १२ करडई/इतर -२० गहू -२०.२० एकूण ६०३.४० हेक्टर --- आशा मावळली खरीप हंगाम पावसाअभावी गेला, तरी परतीचा पाऊस पडेल व रब्बी मोठ्या प्रमाणात घेता येईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण, दिवाळी होऊन गेली, तरी पावसाचा पत्ता नसल्याने ही आशाही मावळल्याने शेतकरी चिंतेत आहेत. --- आगामी काळात चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर ​दरवर्षी रब्बी हंगामात ज्वारीचे पीक यशस्वी झाल्यास कुटुंबाच्या भाकरीसाठी ज्वारी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी कडबा उपलब्ध होत असे, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत होता. यंदा मात्र पावसाअभावी पाणीटंचाई निर्माण झाल्याने पेरणी खोळंबली आहे. परिणामी, आगामी काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता असून, बळिराजापुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. येणारे सात-आठ महिने कसे काढायचे? हा खरा प्रश्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.