Maharashtra Education : दहावी अभ्यासक्रमाचे यंदा बिघडणार गणित; पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा लांबणीवर
Education News : राज्यात पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा एप्रिलअखेर घेण्याच्या निर्णयामुळे शाळांचे वेळापत्रक विस्कळित होणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय अभ्यासक्रमावर परिणाम करणारा ठरणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा एप्रिलअखेरीस घेण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय शाळांचे संपूर्ण वेळापत्रक बिघडवणारा ठरला आहे. विशेषतः दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा पेच निर्माण झाला आहे.