esakal | अर्थसंकल्प : औरंगाबादच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात सेंटर फॉर एक्सलन्स
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी उच्च शिक्षणासाठी वेगवेगळ्या योजनांमधून निधी देण्यात येणार असल्याची घोषणा केली. यातच त्यांनी औरंगाबादच्या अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी महत्त्वाची घोषणा केली आहे.  

अर्थसंकल्प : औरंगाबादच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात सेंटर फॉर एक्सलन्स

sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी उच्च शिक्षणासाठी वेगवेगळ्या योजनांमधून निधी देण्यात येणार असल्याची घोषणा केली. यातच त्यांनी औरंगाबादच्या अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी महत्त्वाची घोषणा केली आहे.  

उच्च व तंत्रशिक्षण विभागाला 12 उत्कृष्ट केंद्रे स्थापन करण्यासाठी 1300 कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. यात औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन महाविद्यालयात, तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा समावेश असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी जिकाचा 80 लाखांचा प्रस्ताव

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रकल्प हे महाविद्यालयापर्यंतच मर्यादित असतात. मात्र, ते वस्तू स्वरूपात यावेत, यासाठी राज्य शासनाने सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी भरीव तरतूद केली आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद (जिका)ने ८० लाख रुपयांचा प्रस्ताव दोन महिन्यापूर्वीच सादर केला आहे.

भाजपचे नगरसेवक आले काळे कपडे घालून आणि... 

जिकाचा महिन्याभरापूर्वीच हीरक महोत्सव साजरा झाला. यापूर्वीच महाविद्यालयाने प्रस्ताव दाखल केला होता. सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत संशोधनाशी निगडीत फॅसिलिटी असणार आहेत. यात इमारत आणि यंत्रसामग्रीचा समावेश असेल. महाविद्यालयात अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थी प्रॉडक्ट डिझाईन करत असतात, ते प्रॉडक्ट व्यावसायिकदृष्ट्या बाजारात आणण्यासाठी इन्क्युबेशन सेंटरची आवश्यकता असते. व्यक्ती किंवा ग्रुपला सपोर्ट करण्यासाठी हे सेंटर काम करते. 

जिकाचा नुकताच हीरक महोत्सव झाला. यापूर्वी महाविद्यालयाने सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी ८० लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे. जाहीर झालेला निधी कोणत्या कारणासाठी वापरता येणार आहे, हे सध्या सांगता येत नाही.
- डॉ. प्राणेश मुरनाल, प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद. 

loading image