लातुरातील चार नव्या दिग्दर्शिका रंगभूमीवर उद्यापासून रंगणार राज्य नाट्य स्पर्धा;

लातुरातील चार नव्या दिग्दर्शिका रंगभूमीवर  उद्यापासून रंगणार राज्य नाट्य स्पर्धा;
Published on: 
LTR26B15632- स्पर्धेचा लोगो ---- लातुरातील चार नव्या दिग्दर्शिका रंगभूमीवर ------- उद्यापासून रंगणार राज्य नाट्य स्पर्धा; नाट्य वर्तुळात उत्सुकतेचे वातावरण -- सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. १४ : हौशी नाट्य कलावंतांना व्यासपीठ मिळवून देणारी ६५ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा १६ नोव्हेंबरपासून लातुरात रंगणार आहे. या स्पर्धेतून नव्या दमाच्या चार दिग्दर्शिका आपल्या कलेचा अनोखा आविष्कार घेऊन रंगभूमीवर पदार्पण करत आहेत. राज्य नाट्य स्पर्धेत दिग्दर्शक म्हणून त्यांचे हे पहिलेच पाऊल असून, या माध्यमातून धडाडीच्या दिग्दर्शिका लातूरच्या रंगभूमीला मिळाल्याचे आशादायक चित्र पाहायला मिळत आहे. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा घेतली जाते. दोन वर्षांपूर्वी लातूर येथे या स्पर्धेचे स्वतंत्र केंद्र मंजूर झाले आहे. स्पर्धेचे ६५ वे आणि लातुरातील स्वतंत्र केंद्रावर भरणाऱ्या स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. दगडोजी देशमुख सभागृहात ही स्पर्धा होणार असून, स्पर्धेत १५ नाटकांनी सहभाग घेतला आहे. या नाटकांचा दररोज एक प्रयोग सादर होणार आहे. विशेष म्हणजे, यंदा प्रथमच धडाडीच्या चार दिग्दर्शिका स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. ---------- LTR26B15633- सुवर्णा बुरांडे उन्नती फाउंडेशनच्या माध्यमातून सुवर्णा बुरांडे या डॉ. समीर मोने यांचे लेखन असलेले ‘लाडू’ हे नाटक घेऊन अभिनय आणि दिग्दर्शनातून आपला वेगळा नाट्याविष्कार सादर करणार आहेत. विशेष म्हणजे हे पुरुष पात्रविरहित नाटक आहे. या स्पर्धेतील हे एक वेगळेच रेकॉर्ड ठरणार आहे. -- LTR26B15636- सुमती सोमवंशी ‘आणि हे शहर सुद्धा’ या रवींद्र वाडकर लिखित नाटकावर आपल्या दिग्दर्शनाचे कसब सुमती सोमवंशी यांनी उमटवले आहे. माजी विद्यार्थी संघ- दयानंद महाविद्यालय या नाट्य संघामार्फत हे नाटक या स्पर्धेत सादर होणार आहे. ------------------- LTR26B15634- करुणा विचारे उदगीरच्या कल्पवृक्ष सांस्कृतिक शैक्षणिक सेवाभावी संस्थेमार्फत ‘मृत्यू आधीच झाला होता’ हे अतुल साळवे लिखित नाटक सादर होत आहे. या नाटकावर दिग्दर्शिका म्हणून करुणा विचारे यांची वेगळी छाप आहे. --- LTR26B15635- सिद्धी गोजमगुंडे प्रसाद दाणी यांचे लेखन असलेली ‘नथिंग टू से’ हे नाटक या स्पर्धेत लातूरची ‘अनुभव सेवाभावी संस्था’ सादर करणार असून या नाटकाला विविधांगी पैलू पाडण्याचे काम सिद्धी गोजमगुंडे या आपल्या दिग्दर्शनातून करत आहेत. त्याचबरोबर या नाटकातील मध्यवर्ती भूमिकाही त्यांनी साकारली आहे. या चारही दिग्दर्शिकांच्या नाटकांबाबत नाट्य वर्तुळात सध्या उत्सुकतेचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.