
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र पब्लिक स्कूलचा विद्यार्थी आराध्य बोर्डे याने दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव कोरले आहे. सिंगापूर येथील नामांकित ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल (जीआयआयएस) संस्थेने आराध्यला पुढील शिक्षणासाठी एक कोटी रुपयांची ‘ग्लोबल सिटीझनशिप स्कॉलरशिप’ जाहीर केली आहे.