
छत्रपती संभाजीनगर: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कला आणि क्रीडा घटकांना अन्य विषयांप्रमाणेच महत्त्वाचे स्थान देण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात महाराष्ट्र राज्य सरकारच्या अंमलबजावणीच्या पातळीवर याची गंभीर दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे.