लातूर : महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील मुलांच्या संघाचा सत्कार करताना डॉ. महेश बेंबडे, डॉ. नल्ला भास्कर रेड्डी, डॉ. विक्रम चिंते आदी.
--
महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाला
बॅडमिंटन स्पर्धेत सांघिक उपविजेते पद
--
लातूर, ता. ६ ः स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व दयानंद वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दयानंद बॅडमिंटन हॉलमध्ये बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील मुलांच्या संघाने सांघिक उपविजेते पद पटकावले. यामध्ये एम.ए. प्रथम वर्षातील प्रशांत अहिरेकर यांनी संघाचे नेतृत्व केले. तर, बीएसडब्ल्यू प्रथम वर्षातील आशिष इंगोले, बीए तृतीय वर्षातील निखिल काळे, विजय गवालवाड आणि सूर्या गजिले या खेळाडूंचा समावेश होता.
या विजेत्या स्पर्धकांचा सत्कार सिनेट सदस्य डॉ. महेश बेंबडे, अ विभागीय बॅडमिंटन स्पर्धेचे चेअरमन डॉ. नल्ला भास्कर रेड्डी आणि डॉ. विक्रम चिंते यांच्या हस्ते करण्यात आला. या संघाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे, मुख्य समन्वयक तथा क्रीडा संचालक डॉ. भास्कर रेड्डी, प्रा. आशिष क्षीरसागर, प्रा. विष्णू तातपुरे आणि क्रीडा विभाग समितीतील सर्व सदस्यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे, सचिव माधवराव पाटील टाकळीकर, सर्व संस्था पदाधिकारी, उपप्राचार्य प्रा. नितीन वाणी, पर्यवेक्षक डॉ. गुणवंत बिरादार, क्रीडा विभाग समितीतील सर्व सदस्य, समन्वयक, विभाग प्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.