महावितरण कर्मचाऱ्यास मारहाण; दोघांना अटक

महावितरण कर्मचाऱ्यास मारहाण; दोघांना अटक
Published on
महावितरण कर्मचाऱ्यास मारहाण; तिघांवर गुन्हा सोनपेठ, ता. १५ (बातमीदार) : शासकीय कामात अडथळा आणून महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, एका आरोपीचा शोध सुरू आहे. गंगाखेड तालुक्यातील महातपुरी येथील महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ कोंडिबा राम मुलगीर (वय ३४) हे परवानगी घेऊन वीजपुरवठा बंद करून नवीन डीपी बसविण्याचे काम करीत होते. वीजपुरवठा बंद केल्याच्या कारणावरून संशयित आरोपी राजू युसूफ (रा. महातपुरी) व शेख समीर शेख जमील (रा. गंगाखेड) यांनी मुलगीर यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच गावात काम करू न देण्याची धमकी दिली. यानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास डीपीचे साहित्य आणण्यासाठी जात असताना महातपुरी बसस्थानकाजवळ आरोपींनी त्यांची मोटारसायकल अडवून पुन्हा वीजपुरवठा सुरू करण्यास सांगितले. यावेळी शिवीगाळ करीत शेख समीर याने मारहाण करून मुलगीर यांचा टी-शर्ट फाडला, तर राजू याने चापट-बुक्क्यांनी मारहाण करून इजा करण्याची धमकी दिली. मुलगीर यांच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक अशोक गिते यांच्या मार्गदर्शनाखाली एम.आय. अशोक हिंगे यांनी कारवाई केली. तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक बळिराम मुंडे करीत आहेत. पोलिसांनी आरोपी शेख उमर, राजू व शेख समीर दोघांना अटक केली असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com