National Award : महेकला मिळणार राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार; कनकशीळची विद्यार्थिनी वीरगाथा स्पर्धेत ठरली विजेती
Mahek Mubeen Shaikh national award Veer Gatha competition winners : कनकशीळ येथील इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनी महेक मुबीन शेख हिला वीरगाथा स्पर्धेत चित्रकला विषयात प्रथम पारितोषिक मिळालं आहे. तिच्या यशामुळे ती राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवडली गेली आहे, आणि राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळवेल.
Mahek Mubeen Shaikh national award Veer Gatha competition winnerssakal
टाकळी राजेराय (जि. छत्रपती संभाजीनगर) : भारतीय सरंक्षण मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या वीरगाथा इव्हेंटमध्ये कनकशीळ (ता. खुलताबाद) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी महेक मुबीन शेख ही चित्रकला परीक्षेत विजेती ठरली.