

Farmer Govind Gonde stands in his seven-acre papaya orchard in Mangrul, Beed district.
esakal
कमलेश जाब्रस
माजलगाव : निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी दुष्काळ, तर कधी अतिवृष्टीच्या झळांनी शेतकऱ्याचं कंबरडं मोडतं. शिवारं करपताना हतबल होऊन बसण्यापेक्षा उपलब्ध पाण्याच्या थेंबाथेंबाचं योग्य नियोजन केलं, तर ही काळी आई कधीच रिकाम्या हातानं परत पाठवत नाही! मंगरूळ क्रमांक दोन (ता. माजलगाव) येथील हिरव्यागार पपईच्या बागेत उभे राहून शेतकरी गोविंद बापूसाहेब गोंडे जेव्हा हे शब्द उच्चारतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत दुष्काळाशी दोन हात करून मिळवलेल्या विजयाची चमक स्पष्ट दिसते.