माळेगावजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; एकजण गंभीर जखमी

माळेगावजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; एकजण गंभीर जखमी
Published on
माळेगावजवळ वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू ------------ ​बीड, ता. १३ : दुचाकी व अज्ञात वाहनाचा भीषण अपघात झाल्याने दुचाकीवरील एका युवकाचा जागीच मृत्यू, तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी (ता. १२) मध्यरात्री अंबाजोगाई- कळंब मार्गावरील माळेगाव (ता. केज) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली. किसन नवनाथ ढगे (वय ३१) व सलीम जयनू शेख (वय २५, दोघेही रा. भोपा, ता. धारूर) हे दोघे दुचाकीवरून (एमएच २६ एएल ५१५७) अंबाजोगाई येथील रुग्णालयात मित्राला भेटण्यासाठी गेले होते. तेथून मूळ गावी परतत असताना पाऊस आणि रस्ता चुकल्याने ते अंबाजोगाई- कळंब मार्गावर आले. माळेगाव चौकात अचानक समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत किसन ढगे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, सलीम शेख हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी सलीम यांना उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच युसूफवडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अपघातानंतर फरार झालेल्या वाहनाचा शोध पोलिस घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com