महिनाभरात सर्व सुरळीत होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद : महिनाभरात सर्व सुरळीत होणार

औरंगाबाद : महिनाभरात सर्व सुरळीत होणार

औरंगाबाद : दि.मलकापूर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयने सहा महिन्याचे निर्बंध आणल्यानंतर घाबरलेल्या ग्राहकांतर्फे पैसे काढण्यासाठी आमचे पूर्ण पैसे कधी मिळणार या विषयी विचारणा करण्यात येत आहे. यात रोज बँक कर्मचारी आणि खातेदारांत रोज वाद होत आहे. मात्र बँकेतर्फे सारवा-सारव करीत महिनाभराच्या आता सर्वकाही सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे खातेदारांना सांगण्यात येत असल्याचे खातेदारांनी सांगितले. तसेच नियमित व्यवहार असलेल्या व्यापाऱ्यांनी दुसरी बँकेचा शोध घेत तिकडे व्यवहार सुरु केले आहे.

मलकापूर बँकेच्या शहरात सहा शाखा असून यात ५० हजारहून अधिक खातेदार आहेत. यात व्यापारी सर्वाधिक खातेदार असून रोजचा व्यवहार ते याच बँकेतून करीत होते. बँकेवर निर्बंध आल्याने व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपये बँकेत अडकून पडले आहेत. यामुळे व्यापाऱ्यांनी आता दुसऱ्या बँकेतील खात्यांचा वापर सुरु केले आहे. तर काहींनी नवीन खाते उघडून त्याद्वारे व्यवहार करीत आहे.

हेही वाचा: INDvsNZ 2nd test : भारताने कसोटी मालिका १ - ० ने जिंकली

मलकापूर बँकेमुळे आमचे लाखो रुपये प्रत्येक व्यापाऱ्यांचे पैसै अडकून पडले आहेत. दैनंदिन व्यवहारातील पैशातून दुकानांतील साहित्याची उलाढाल करण्यात येत असते. पैसे अडकल्यामुळे अनेकांना त्रास झाला आहे. आता दुसरी बँकेत व्यवहार करण्यात येत आहे. फक्त हे निर्बंध उठण्याची वेळ बँकेतर्फे पाहण्यात येत आहे. त्यानंतर बँकेतील सर्व पैसे काढून दुसऱ्या बँकेत ठेवणार असल्याचे एका खातेदारांनी सांगितले.

दुसरीकडे अनेक वर्षांपासून बँकेने जी प्रतिष्ठा मिळवली होती. या निर्बंधामुळे ती धुळीस मिळाली. यामुळे बँकेच्या संचालक मंडळातर्फे बँके वाचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यामुळे वरिष्ठ स्तरावरील काही अधिकाऱ्यांना एनपीए कमी करा, अन्यथा घरी जा अशा नोटिसा देण्यात आली होती. त्यामुळे महिनाभराच्या आत बँक सर्वकाही सुरळीत करण्याचे आश्‍वासन खातेदारांना देत आहे. असे असले तरी खरंच महिनाभराच्या आत बँक रिकव्हर होणार का याकडे आता लक्ष लागून आहे.

Web Title: Malkapur Urban Bank Will Be Smooth Within A Month

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..