Chh. Sambhajinagar Crime : माथेफिरूचा एकतर्फी प्रेमातून महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला! गजानन महाराज मंदिर चौकात थरार
Crime News : गारखेडा येथील गजानन महाराज मंदिर चौकात १० फेब्रुवारीला रात्री ८ वाजता एक माथेफिरू व्यक्तीने एकतर्फी प्रेमामुळे ३५ वर्षीय महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला केला. या आधी देखील महिला त्याच्याविरोधात सातारा पोलिसांत तक्रार दाखल केलेली होती.
गारखेडा : लग्न करण्यास नकार दिल्याने ३५ वर्षीय महिलेवर एकतर्फी प्रेमातून माथेफिरूने कुऱ्हाडीने वार केला. ता. १० फेब्रुवारीला रात्री आठला गजानन महाराज मंदिर चौकातील सिग्नलवर हा प्रकार घडला.