esakal | खाम नदीत वाळूज एमआयडीसीतील कामगार दुचाकीसह गेला वाहून,शोध सुरु/Aurangabad News
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद - खाम नदीत पुराच्या पाण्यात वाळूज औद्योगिक वसाहतीतील (Waluj MIDC) एक कामगार दुचाकीसह आज बुधवारी (ता.29) रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास वाहून गेला आहे.

खाम नदीत वाळूज एमआयडीसीतील कामगार दुचाकीसह गेला वाहून,शोध सुरु

sakal_logo
By
रामराव भराड

वाळूज (जि.औरंगाबाद) - खाम नदीला (Kham River) दोन दिवसांपासून पूर आला आहे. त्यामुळे पंढरपूर, वळदगावचा संपर्क तुटला. परिणामी नागरिकांना व वाळूज औद्योगिक वसाहतीतील कामगारांना कामावर ये-जा करण्यास मोठी दिक्कत होत आहे. याच खाम नदीत पुराच्या पाण्यात वाळूज औद्योगिक वसाहतीतील (Waluj MIDC) एक कामगार दुचाकीसह आज बुधवारी (ता.29) रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास वाहून गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच वळदगाव, पंढरपूर, कांचनवाडी (Aurangabad) येथील नागरिकांनी खाम नदीत वाहून गेलेल्या दीपक शेषराव कौसडीकर (वय 58 रा. कांचनवाडी, औरंगाबाद) याचा शोध घेत आहे. तो वाळूज औद्योगिक वसाहतीतील एक्साइड कंपनीच्या गोडाऊनमध्ये सेक्युरिटी होता.

हेही वाचा: लातूर : मांजरा,तेरणाच्या पुरामुळे राज्यमार्ग बंद; वाहतूक खोळंबली

दरम्यान मंडळ अधिकारी रामदास गाडेकर, तलाठी रघुनाथ शेळके, भगवान पवार व वाळुज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वाहून गेलेल्या दीपक कौसडीकर याचा शोध सुरू आहे.

loading image
go to top