Crime News : जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; पिशोरमध्ये युवकाचा खून
Chh. Sambhajinagar : पिशोर येथील झोपडपट्टीत जुन्या वादातून शेख शकील याचा धारदार शस्त्राने छातीत वार करून खून करण्यात आला. अलीम पठाण याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे.
पिशोर : जुन्या वादातून एकाचा छातीत धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना शनिवारी (ता. १७) रात्री नऊच्या सुमारास पिशोर येथील झोपडपट्टी परिसरात घडली. शेख शकील शेख जमील (वय ४०) असे मृताचे, तर अलीम सलीम पठाण (वय २५) असे संशयित आरोपीचे नाव आहे.