Aurangabad : विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rape News
Aurangabad : विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक

Aurangabad : विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक

वाळूज (जि.औरंगाबाद) : शिवण क्लाससाठी जाणाऱ्या एका १५ वर्षीय विद्यार्थिनीला पंचवीस वर्षीय तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला. विशेष म्हणजे त्यावेळी मोबाईलमध्ये काढण्यात आलेली चित्रफित व्हायरल करण्याची धमकी देत हा प्रकार दोन महिन्यांपासून सुरू होता. आईने मुलीची बॅग तपासल्याने ही घटना समोर आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पंधरा वर्षीय विद्यार्थीनी आई व सावत्र वडीलासह बजाजनगर (Aurangabad) येथे राहते. तिला शिवणक्लास लावला असून ती अंदाजे दोन महिन्यांपूर्वी स्कुटीवर क्लासवरुन घरी असताना तिची स्कुटी मोहाटादेवी चौकात बंद पडली. त्यामुळे तिने तेथे ऊभा असलेल्या (Waluj) अरविंद सदावर्ते (वय २५ ) याच्या मोबाईलवरून आईला फोन करून माहिती दिली होती. तेव्हापासून तिचा मोबाइल नंबर आरोपीकडे होता. (Man Misbehave With Minor Girl In Waluj Area Of Aurangabad)

हेही वाचा: Hingoli Accident : बस-ट्रकच्या अपघातात ४ ठार, चोवीस प्रवासी जखमी

त्यामुळे त्याने अल्पवयीन विद्यार्थीनीला फोन करून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तेव्हापासून दोघेही भेटत असत. एक दिवस त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून त्याच्या रुमवर नेऊन तिच्यावर लैंगिक आत्याचार केला. विशेष म्हणजे त्यावेळी त्याने मोबाइलमध्ये चित्रफित तयार केली. ही चित्रफित तिला दाखवून ती व्हायरल करण्याची धमकी देत अरविंद सदावर्ते याने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. सुमारे दहा ते बारा दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या आईने मुलीची बॅग तपासली असता त्यामध्ये पॉझिटिव्ह असलेली प्रेगन्सी किट व गोळ्या आढळून आल्या. याबाबत तिला विचारले असता तीनि सांगितले की, ज्या दिवशी स्कुटी बंद पडली होती. त्या दिवशी ज्या मुलाने फोन करून माहिती दिली होती. त्याने अत्याचार करून चित्रफित काढली. ती व्हायरल करण्याची धमकी देत त्याने वेळोवेळी अत्याचार केल्याचे सांगितले.

हेही वाचा: नांदेडच्या काॅफी शाॅपमध्ये अश्लील चाळे, पोलिसांची कारवाई

दरम्यान पीडित मुलीची आई, वडील, आईची मैत्रीण व गुरुभाऊ यांनी पीडित मुलीसह आरोपीच्या रुमवर धाव घेतली. त्याला जबाब विचारात त्याचा मोबाईल तपासला असता त्यात ती चित्रफित असल्याचे दिसून आले. यावेळी अरविंद सदावर्ते याने मी तुमच्या मुलीशी लग्न करणार आहे. असे म्हणाला. त्यामुळे त्यांनी तुझ्या आई वडिलांना घेऊन ये, तोपर्यत चित्रफित असलेला मोबाईल आमच्याकडे राहिल, असे सांगितले. त्यानंंतर सदावर्ते हा त्याच्या मुळगावी दाभा (पोस्ट ईटोली, ता.जिंतुर, जि.परभणी) येथे निघुन गेला. तो परत न आल्याने मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे करित आहेत.

Web Title: Man Misbehave With Minor Girl In Waluj Area Of Aurangabad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :aurangabad
go to top