दर्शनासाठी गेलेल्या महिलेच्या
गळ्यातील मंगळसूत्र लंपास
सिडको ः दर्शनासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील २३ हजार २६० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरट्याने लंपास केले. ही घटना १९ ऑक्टोबरला रात्री साडेआठच्या सुमारास सिडकोतील रेणुकामाता मंदिर परिसरात घडली. याप्रकरणी अनिता भारत राठोड (३३, रा. जटवाडा) यांच्या फिर्यादीवरून चोरट्याविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. या प्रकरणाचा तपास हवालदार मालकर करत आहेत.
------
मंगळसूत्र चोरताना तरुणीला पकडले
विद्यापीठ परिसर ः कुंकू खरेदी करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र चोरणाऱ्या तरुणीला जागीच पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले. हा प्रकार २० ऑक्टोबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील बुद्धलेणी परिसरात घडला. पंचशीला मुकुंद साळवे (४०, रा. लालमंडी, बेगमपुरा) यांच्या फिर्यादीवरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
यासंदर्भात पोलिसांच्या माहितीनुसार पंचशीला या विद्यापीठात कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. दरम्यान, तिथे कुंकू खरेदी करत असताना एका तरुणीने फिर्यादीच्या गळ्यातील १५ हजार रुपयांचे मंगळसूत्र आणि अर्धा ग्रॅम (५ हजार रुपये किमतीचे) मणी चोरी केले. हा प्रकार फिर्यादीच्या लक्षात येतात तिने जागीच पकडले. याप्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली. तिचा चौकशी करून, वयाची पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास महिला हवालदार सोनवणे करत आहेत.
-----
मायलेकासह बहिणीला टोळक्याची मारहाण
मुकुंदवाडी ः उसने पैसे देण्याच्या कारणावरून तिघांच्या टोळक्याने तरुणाच्या घरी येत त्याच्यासह आई, बहिणीला मारहाण केली. ही घटना २० ऑक्टोबरला संतोषीमातानगर परिसरात घडली. याप्रकरणी तिघांविरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. अविनाश जाधव, ऋषी जाधव आणि अण्णा जगताप (रा. संतोषीमातानगर, मुकुंदवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणात स्वप्नील सुनील पाळंदे (रा. संतोषीमातानगर, मुकुंदवाडी) यांनी फिर्याद दिली.
-----