

Manoj Jarange vows to reveal the truth behind the audio clip controversy linked to the Maratha reservation movement.
esakal
अंकुशनगर: ‘‘मराठा आरक्षण आंदोलनाशी संबंधित नुकतीच जाहीर केलेली ध्वनिफीत (ऑडिओ क्लिप) खोटी ठरविण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू असल्याची कुजबूज कानावर आली आहे. मात्र, कितीही प्रयत्न झाले तरी या प्रकरणातील सत्य समाजासमोर आणणारच’’, असा निर्धार मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाच्या तपासात सत्याच्या बाजूने उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.