वडीगोद्री : आरक्षण घेणारच आहे. अजून थोडे थांबू, पण तयारी अशी करू की चारही बाजूंनी तुम्हाला जायला रस्ता मिळणार नाही. डाव कसे टाकायचे, हे आम्हाला चांगले माहीत आहे. मुंबईला जाण्याचा विचार सुरू आहे, पण त्याबद्दल सध्या काही सांगणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे मंगळवारी (ता. ११) सरकारला दिला आहे.