परभणी-हिंगोली एकत्रित बातम्या

परभणी-हिंगोली एकत्रित बातम्या
Published on
फोटोसहABD26J79749 मानवत ः मानवत परभणी रस्त्यावर खरवडे किन्होळा पाटी परिसरातील पुलाची झालेली दुरवस्था ------------- पुलाचे काँक्रीट निखळले, सळ्या उघड्या --------------- मानवत-परभणी महामार्गावर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर मानवत, ता.१९(बातमीदार) : मानवत-परभणी-पाथरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील खरवडे-किन्होळा पाटी परिसरातील पुलाच्या दुरवस्थेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुलाखालली भागात काँक्रीट मोठ्या प्रमाणात निखळून पडले असून, आतील लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पुलावरून रोज मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. एसटी बस, ट्रक, जड वाहने, चारचाकी, दुचाकींची सतत वर्दळ असताना पुलाची अवस्था धोकादाय बनल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुलाच्या संरचनेची तातडीने तज्ज्ञांकडून तपासणी न झाल्यास भविष्यात गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता वाढली आहे. पुलाच्या खालच्या भागात अनेक ठिकाणी काँक्रीट निखळल्याचे छायाचित्रातून स्पष्ट दिसत आहे. लोखंडी सळ्या उघड्या पडल्याने पुलाची झीज झाल्याचे दिसत आहे मात्र या गंभीर बाबीबाबत संबंधित विभागाकडून अद्याप ठोस उपाययोजना का करण्यात आली नाही असा सवाल नागरिकांनी केला आहे. दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होण्यापेक्षा दुर्घटनेपूर्वीच तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. संबंधित विभागाने तत्काळ या धोकादायक पुलाची पाहणी करून संरचनात्मक तपासणी करावी, पुलाची दुरुस्ती व मजबुतीकरणाचे काम तातडीने हाती घ्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पुलावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी तोपर्यंत वेग कमी करून सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात येत आहे. ((चौकट))) प्रशासन केंव्हा होणार जागी? पुलाची अवस्था धोकादायक असून एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? काँक्रीट निखळून लोखंडी सळ्या उघड्या पडलेल्या असताना पुलाची तातडीने तपासणी का होत नाही. मोठ्या दुर्घटनेनंतर जबाबदारी निश्चित करण्यापेक्षा आजच पुलाची सुरक्षितता तपासणे गरजेचे आहे. ((चौकट))) आधीच उपाययोजना करा पुलाची तज्ज्ञांकडून संरचनात्मक तपासणी करावी, धोकादायक भागाची तातडीने दुरुस्ती व मजबुतीकरण करावे, हा पुल कमकुवत असल्याचा व सुरक्षिततेबाबत स्पष्ट सूचना फलक लावावेत, आवश्यक असल्यास वाहतुकीवर वेगमर्यादा व नियंत्रणाचे उपाय करावेत. संबंधित विभागाने पाहणीचा अहवाल सार्वजनिक करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी. ---------------------------- फोटोABD26J79750 सेनगाव ः तालुक्यातील नानसी येथील जि.प. प्राथमिक शाळेचा विकसीत केलेला परिसर. नानसीची जि.प. शाळा तालुक्यात अव्वल ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमात प्रथम सेनगाव, ता.१९ (बातमीदार): ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमात तालुक्यातील नानसी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. शिक्षकांचे नियोजनबद्ध प्रयत्न, विद्यार्थ्यांसाठी निर्माण केलेले शैक्षणिक वातावरण, ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग यामुळे शाळेने हे उल्लेखनीय यश मिळवले आहे. शाळेचे मुख्याध्यापक राहुल जीवराज अंडील, उपक्रमशील शिक्षक रोहित भानुदास ढवळे यांनी शाळेच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले. शाळेची स्वच्छता, परिसराचे सौंदर्यीकरण, हिरवाई, शैक्षणिक वातावरण, विविध उपक्रमांवर भर देण्यात आला. शाळेच्या विकासात ग्रामस्थांनीही श्रमदान, आर्थिक सहकार्य आणि प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. शाळेचा विकास केवळ शासकीय निधीपुरता मर्यादित न ठेवता गावकऱ्यांना सोबत घेऊन विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यामुळे शाळेच्या परिसराचे रूप पालटण्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी अधिक आनंददायी, प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. ((चौकट)) पालकमंत्र्यांकडून कौतुक शाळेच्या या कामगिरीची दखल अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी घेतली. त्यांनी शाळेतील शिक्षक, ग्रामस्थांचे कौतुक केले. तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाल्याने नानसी जि. प. शाळेने ग्रामीण भागातील शाळांच्या विकासासाठी एक सकारात्मक उदाहरण निर्माण केले आहे. शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ यांच्या एकत्रित प्रयत्नांतून शाळेचा विकास शक्य असल्याचे या शाळेने दाखवून दिले आहे. याबद्दल मुख्याध्यापक राहुल अंडील, शिक्षक रोहित ढवळे, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांचे अभिनंदन होत आहे. --------------------------- दिलीप चव्हाण, सुनील देवडा, अग्रवाल यांची बिनविरोध निवड मराठवाडा अर्बन बँक्स को-ऑपरेटिव्ह असो. निवडणुक हिंगोली, ता.१९ (बातमीदार) : मराठवाडा अर्बन बँक्स को-ऑपरेटिव्ह असोसिएशन लि. छत्रपती संभाजीनगरच्या संचालकपदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत दिलीप चव्हाण, सुनील देवडा, गोपाल अग्रवाल या तिघांची बिनविरोध निवड झाली आहे. मराठवाड्यातील अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राशी संबंधित संस्थांच्या विकासासाठी, सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. या पार्श्वभूमीवर अनुभवी, सहकार क्षेत्राची जाण असलेल्या तिघांची संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याने सहकार क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या निवडीमुळे दिलीप चव्हाण (हिंगोली), सुनील देवडा हिंगोली, गोपाल अग्रवाल (जवळा बाजार) यांच्या बिनविरोध निवडीबद्दल सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, बँक संचालक, अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. ------------------------------- फोटोसह -अर्ना काबरा ABD26J79757 -स्वरा भुसारे ABD26J79756 ---------------- एबीएमच्या दोन विद्यार्थिनींची इस्रो अभ्यासदौऱ्यासाठी निवड अवकाश संशोधनाची घेणार प्रत्यक्ष अनुभूती हिंगोली, ता.१९ (बातमीदार) : शहरातील ‘एबीएम’ इंग्लिश हायस्कूलच्या अर्ना सचिन काबरा, स्वरा बळीराम भुसारे या दोन गुणवंत विद्यार्थिनींची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या विशेष अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. शालेय वयातच विद्यार्थ्यांच्या मनातील जिज्ञासेला पंख देत त्यांना विज्ञानाच्या अथांग विश्वाची ओळख करून देण्यासह प्रत्यक्ष अनुभवातून वैज्ञानिक दृष्टिकोन विज्ञान हे केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची, नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची आणि संशोधनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी एबीएम हायस्कूलकडून सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. याच उपक्रमांचा भाग म्हणून या विद्यार्थिनींना इस्रोला भेट देण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. या अभ्यास दौऱ्यादरम्यान विद्यार्थिनींना इस्रोचे प्रत्यक्ष कामकाज, अंतराळ संशोधनाची प्रक्रिया, अत्याधुनिक तंत्रज्ञान, भारताची अंतराळ क्षेत्रातील प्रगती जवळून पाहता येणार आहे. थेट इस्रोच्या वैज्ञानिकांशी संवाद साधून शंकांचे निरसन करण्याची संधीही त्यांना मिळणार आहे. संस्थेचे अध्यक्ष दिलीप बांगर, मुख्याध्यापक जोसेफ के. जे. यांच्यासह शिक्षकवृंदांनी दोन्ही विद्यार्थिनींचे कौतूक करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. -------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com