
मानवत : जुन्या भांडणाच्या कारणावरून डोक्यात कुदळ मारून ४४ वर्षीय वाहनचालकाचा खून करण्यात आला. ही घटना शनिवारी (ता. २६) दुपारी एकला शहरातील बायपास मार्गावरील झरी नाका येथील एका हॉटेलमध्ये घडली. ज्ञानेश्वर वैजनाथ पवार (रा. कोक्कर कॉलनी, मानवत) असे मृताचे नाव आहे.