Maratha Protest : मराठा समाज बांधवांचा रास्ता रोको; केऱ्हाळा फाटा, मनोज जरांगेंच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी
Manoj Jarange : केऱ्हाळा फाट्यावर मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन करत मनोज जरांगेंच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. उपोषण करणाऱ्या १०४ कार्यकर्त्यांची प्रकृती खालावली आहे, त्यामुळे सरकारने लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
निल्लोड : सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा फाटा येथे मराठा समाजाच्या वतीने बुधवारी (ता.२९) रास्ता रोको करण्यात आला. यावेळी मनोज जरांगे यांच्यासह १०४ उपोषण करणाऱ्या सहकार्यांची प्रकृती खालावली आहे.