मुक्तिसंग्राम दिनी कडक बंदोबस्ताचा फटका

मुक्तिसंग्राम दिनी कडक  बंदोबस्ताचा फटका
Published on
OSM26B07029 धाराशिव ः मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना सोडविण्यासंबंधी पोलिसांशी चर्चा करताना आमदार कैलास पाटील. ---- मराठा आंदोलक नजरकैदेत पोलिस ठाण्यात आमदार पाटील येऊन बसल्यावर आंदोलकांना सोडले सकाळ वृत्तसेवा ः धाराशिव, ता. १८ : मराठा आरक्षणावरून निर्माण झालेला तणाव, आंदोलकांकडून काळे झेंडे दाखवण्याची शक्यता आणि संभावित आंदोलनांची चाहूल लक्षात घेता प्रशासनाने मराठा आंदोलकांना ताब्यात घेत नजरकैदेत ठेवले. त्यामुळे तणाव वाढला, अखेर आमदार कैलास पाटील यांच्या मध्यस्थीने आंदोलकांना सोडून देण्यात आले. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मराठा आंदोलकांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले होते. गुरुवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी मराठा आंदोलकांना त्यांच्या घरातून थेट आनंदनगर पोलिस ठाण्यात आणले आणि नजरकैदेत ठेवले. ही माहिती समजल्यानंतर मराठा बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकले आणि जरांगे पाटील यांचे आंदोलन स्थगित झाले असताना आणि पालकमंत्र्यांचे ध्वजवंदन शांततेत होत असताना आंदोलकांना नजरकैदेत का ठेवले, असा संतप्त सवाल केला. दरम्यान, आमदार कैलास पाटील यांनी थेट आनंदनगर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांचा विरोध डावलून त्यांनी आंदोलकांना बाहेर आणले. ....... ..... फोटो क्रमांक ः OSM26B07029

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com