Maratha Reservation : आंदोलनाचा भडका उडताच ‘महामंडळ आपल्या दारी’!

‘मराठा समाजासाठी आम्ही हे केले, पुढे हे करणार’चे जागोजाग फलक
Mahamandal Aapalay Dari Flex
Mahamandal Aapalay Dari Flexsakal

छत्रपती संभाजीनगर - मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीने जोर धरला आहे. आता नाही तर कधीच नाही या भावनेतून गावागावांतून लाखो समाजबांधवांचा पाठिंबा या आंदोलनाला मिळत आहे. आता या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी सरकारकडून धडपड केली जात आहे.

त्यात मराठा समाजासाठी सरकारने आतापर्यंत काय काय केले, पुढे काय करणार आहोत, हे दाखविण्यासाठी ‘सारथी’ आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सध्या त्याचा प्रचार, प्रसिद्धीचा शासकीयस्तरावरुन धडाका सुरु झाला आहे.

मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या मर्यादेत राहून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. सध्याच्या घडीला मराठा आरक्षण हाच चर्चेतला मुद्दा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आतापर्यंत सुमारे ६० जणांनी प्राणाहुती दिली आहे. यामुळे या आंदोलनाच्या ज्वाळा दिवसेंदिवस भडकतच आहेत.

याच काळात राज्य सरकारकडून सध्या मराठा समाजाच्या अर्थिक, शैक्षणिक,सामाजिक विकासासाठी सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या सारथी ( छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था) व अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची माहिती देण्यासाठी प्रचार, प्रसिद्धी मोहिम राबवली जाणार आहे, यासाठी सध्या जागोजागी बॅनरबाजी होताना दिसत आहे.

सारथी संस्थेचे माहितीपत्रक वाटप , एमकेसीएलमार्फत प्रशिक्षण घेत असलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे मनोगत ऐकवणे, कौशल्य विकास प्रशिक्षण घेतल्यानंतर रोजगाराच्या संधीबाबत मार्गदर्शन सत्र आयोजन, या मोहिमेदरम्यान घेण्यात शिबिराच्या ठिकाणी सारथी संस्थेचे यशस्वी विद्यार्थ्याचे बॅनर तयार करून लावल्यास भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांना व पालकांना सारथी संस्थेचे योगदान याविषयीचा प्रचार केला जाणार आहे.

वास्तविक पाहता या महिन्यातच मराठा आरक्षण विद्यार्थी जनआंदोलन समितीच्यावतीने सारथीच्या विभागीय कार्यालयासमोर १८ ऑक्टोबरपासून चार पाच दिवस उपोषण केले होते. सारथीकडून दिल्या जाणाऱ्या फेलोशिपसाठी अर्ज केलेल्यांना रजिस्ट्रेशन केल्याच्या तारखेपासून फेलोशिप द्यावी, रजिस्ट्रेशन केलेल्यांना सरसकट फेलोशिप देण्यात यावी अशा प्रमुख मागण्या होत्या.

एकीकडे हे वास्तव आहे तर दूसरीकडे शासनाकडून सारथी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून मराठा समाजासाठी किती योजना राबवल्या जात आहेत याची मार्केटींग करत आहे. ‘महामंडळ आपल्या दारी’ ही मोहिम मराठवाड्यात १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शिबिर आयोजित करण्यात येणार आहेत.

‘सारथी’चे असेही चित्र

‘सारथी’कडे यंदा १३०० जणांनी फेलेशीपसाठी रजिस्ट्रेशन केले मात्र फक्त २०० जणांनाच फेलोशीप मंजूर झाली. एकीकडे मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक विकासासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे सांगते मात्र फेलोशिपसाठीचे हे चित्र आहे. ‘सारथी’ला निधीची तरतूद केली जाते मात्र त्यापैकी बराचसा निधी खर्च न होता परत जातो, असे काही विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com