Maratha Reservation : सरकारने तातडीने लेखी मसुदा द्यावा; कुणबी नोंदी तपासणीसाठी मनुष्यबळ वाढवा - मनोज जरांगे

मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आल्यानंतर दोन दिवस अधिक वाट पाहिली.
Maratha Reservation
Maratha ReservationEsakal

छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत जो ‘टाइम बॉण्ड’ ठरलेला आहे. तो लिखित स्वरूपात देण्याचे ठरले आहे. मात्र, सरकारने तो अद्यापही सादर केला नाही. तातडीने तो लेखी मसुदा लिखित स्वरूपात सादर करावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी (ता.१०) पत्रकार परिषदेत केली.

यासह मराठवाड्यासह राज्यभरात कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी तपासणीसाठी मनुष्यबळ कमी आहे. ते वाढवावे, असेही श्री. जरांगे यांनी नमूद केले. ते म्हणाले, ‘‘आतापर्यंत लेखी मसुदा देणे अपेक्षित होते.

पण, मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आल्यानंतर दोन दिवस अधिक वाट पाहिली. शासनाने कुणबी नोंदी शोधण्याचे काम गतीने करावे. विदर्भातील काही जिल्ह्यात अद्यापही तपासणी काम सुरू झालेले नाही. ते सुरू करावे. कुणाच्या तरी दबावामुळे लपून ठेवलेले मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण मिळणार आहे.

आधी मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा. त्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाटेल तेवढी वाढवा. इतर आरक्षणाच्या मर्यादा वाढविण्यावर आमचे काही मत नाही. आम्ही आमचा हक्क मागत आहोत. काही जिल्ह्यांत ५० हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत’’, अशी मागणी त्यांनी केली.

जरांगेंना पाठिंबा ः अमित देशमुख

आमदार बच्चू कडू यांनी गुरुवारी रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांची रुग्णालयात भेट घेतली. त्यानंतर शुक्रवारी आमदार अमित देशमुख यांनी जरांगे यांची रुग्णालयात भेट घेत विचारपूस केली. श्री. जरांगे यांच्या लढ्याला आपला पाठिंबा आहे. राज्य आणि केंद्र शासनाने वेळ वाया न घालवता मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे.

सामाजिक सलोखा कायम राहणे आवश्यक असून, नेत्यांनी सामाजिक तेढ वाढविणारी वक्तव्ये करू नये, असेही श्री. देशमुख म्हणाले. यावेळी शहर जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष शेख युसूफ, सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर, जिल्हा बँकेचे संचालक जगन्नाथ काळे, माजी गटनेते भाऊसाहेब जगताप उपस्थित होते.

धनगर, मुस्लिम समाजाने हक्क मागावा

‘‘मराठा समाजाप्रमाणेच धनगर आणि मुस्लिम समाजाने आपल्या लेकराकडे पाहत आपला हक्क मागावा; कारण तुमची शक्ती मराठा समाजाएवढी आहे. मारवाडी, लिंगायत समाजाच्या नोंदीतही कुणबी आढळत आहे. त्यांचाही कुणबीत समावेश करायला हवा.

यामुळे मात्र भुजबळांची अडचण होईल. ते अशा नोंदी सापडलेल्या किती जातींनी विरोध करतील. या सर्व जातींनी आमच्या सोबत यावे’’, असेही श्री. जरांगे म्हणाले. मराठवाड्यात पावसाअभावी पिके गेली आहेत. पाणी नसल्यामुळे अडचणी वाढल्या असून, सरकारने दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी जरांगे यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com