Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

Marathwada Kunbi Certificate Distribution Update : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात ३५९ दिवसांत ७४ हजार १२४ कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप झाले. २९ ऑगस्टपूर्वी प्रलंबित जात प्रमाणपत्र अर्ज निकाली काढण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
Kunbi certificate latest update Maharashtra

Kunbi certificate latest update Maharashtra

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर : कुणबी प्रमाणपत्रांसह मराठा आरक्षणाच्या विविध मुद्द्यांवर मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २९ ऑगस्टपासून उपोषण करण्याचा इशारा दिला (Kunbi certificate latest update Maharashtra) आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. २५) विभागीय प्रशासनाकडून ऑनलाइन बैठकीत आढावा घेण्यात आला. त्यानुसार, गेल्या ३५९ दिवसांत मराठवाड्यात ७४ हजार १२४ कुणबी प्रमाणपत्रे वाटप केल्याची माहिती देण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com