
गेवराई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाने शनिवारी रविवारी मुंबईकरांना एक वेगळाच अनुभव पाहण्यास मिळाला. सरकारच्या अडथळ्यांकडे दुर्लक्ष करत गेवराईतील आंदोलकांनी थेट रस्त्यावर मैदानी खेळांचा डाव रंगवला. कधी घोषणाबाजी, कधी ठिय्या तर कधी खेळांच्या थराराने मुंबईचे वातावरण भारून गेले.